राजे, सर्वांना खिशात घेऊन फिरतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 23:14 IST2018-10-29T23:14:15+5:302018-10-29T23:14:47+5:30
कºहाड : साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सोमवारी सकाळी कºहाडच्या विश्रामगृहावर महसूलमंत्री चंद्र्रकांत पाटील यांची भेट घेतली. राष्ट्रवादी ...

राजे, सर्वांना खिशात घेऊन फिरतात
कºहाड : साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सोमवारी सकाळी कºहाडच्या विश्रामगृहावर महसूलमंत्री चंद्र्रकांत पाटील यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसअंतर्गत सुरू असणाºया कलहाच्या पार्श्वभूमीवर या भेटीची उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यातच ‘राजे, सर्वांना खिशात घेऊन फिरतात,’ असे वक्तव्यही मंत्री पाटील यांनी केल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
साताºयाचे खासदार म्हणून उदयनराजे भोसले काम पाहतायत; पण जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदार यांचे ट्युनिंग जुळत नसल्याचा अनुभव आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून उदयनराजेंच्या उमेदवारीला जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी पवारांकडे विरोध केल्याची चर्चा आहे. मात्र, उदयनराजे रिंगणात असणार, हे सांगायला जोतिषाची गरज लागणार नाही.
दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीत अस्वस्थ असणारे उदयनराजे भाजपमध्ये आले तर स्वागतच असेल, असे उत्तर दिले होते. त्या वक्तव्यानंतर काही काळातच उदयनराजेंनी महसूलमंत्री चंद्र्रकांत पाटील यांची घेतलेली ही भेट महत्त्वाची तर आहेच; पण त्याबरोबर राजे कुणाला घाबरत नाहीत, सर्वांना खिशात घेऊन फिरतात, अशी चंद्रकांत पाटील यांनी केलेली टिपण्णी चर्चेची आहे.